Homeइतरई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी

ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी

• खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन
कोल्हापूर :
पीएम ई बस योजनेतून, केएमटीला शंभर ई बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १० ई बसेस कोल्हापुरात दाखल झाल्यात. तर ऑगस्ट महिन्यात सर्व शंभर ई बसेस कोल्हापुरात येतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि केएमटीची आर्थिक घडी सुधारेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. केएमटी वर्कशॉपला भेट देवून खा. महाडिक यांनी या नव्या बसेसची पाहणी केली.
प्रवाशांना केएमटीची अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आणि १०० ईलेक्ट्रीक बसेस कोल्हापूरसाठी मंजूर झाल्या. त्यापैकी १० ई-बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज या बसेसची पाहणी केली. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, उपायुक्त परितोष कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. धनंजय महाडिक यांनी केएमटीच्या बुध्द गार्डनमध्ये उभारलेले चार्जिंग स्टेशन, डेपो आणि कार्यालयाची पाहणी केली. ई बसेस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह असावे, अशी सुचना खासदार महाडिक यांनी केली. तसेच केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली. नवीन ई बसेसची पाहणी करून त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांसमवेत नव्या बसमधून फेरफटकाही मारला. सार्वजनिक प्रवासी वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रदुषण मुक्त झाली पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रीक बसेसला प्राधान्य दिले. सातत्याने पाठपुरावा केल्याने, कोल्हापूर शहराला पहिल्यांदा १०० ई बसेस मंजुर झाल्या. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी शंभर टक्के निधी केंद्र शासनाने दिला. लवकरच १०० ई बसेस के एम टीच्या ताफ्यात दाखल होतील, असे आश्‍वासन महापालिका निवडणूकीपूर्वी दिले होते. त्याची पुर्तता होत असून, कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे असे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कार्यक्रमाला नगरसेवक मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, प्रा. जयंत पाटील, बबन मोकाशी, चंद्रकांत संकपाळ, प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, नगरसेविका दिपा ठाणेकर, रेखा उगवे, माधुरी नकाते, नेहा तेंडुलकर, निलीमा पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, पी. एन. गुरव, हेमंत आराध्ये, प्रसाद जाधव यांच्यासह केएमटी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page