Homeकला - क्रीडाशालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात

शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात

• सभेला १३० क्रीडा शिक्षकांची उपस्थिती
कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासाठी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा महावीर कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडली. सभेला १३० क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
सभेत खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी, प्राथमिक प्रवेशिका व प्रवेश अर्ज तयार करणे, ऑनलाइन ओळखपत्र निर्मिती, स्पर्धांमध्ये प्रवेश नोंदविण्याची प्रक्रिया तसेच जन्मतारखेच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी अनिवार्य असल्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान दोन सांघिक व एका वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविणे बंधनकारक असल्याची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महावीर कॉलेजचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा समितीचे नूतन सभापती तथा नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेबाबत क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत स्पर्धा आयोजनात क्रीडा शिक्षकांनी कायम सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. स्पर्धा कालावधीत पोलीस बंदोबस्त, एज व्हेरिफिकेशन टेस्ट तसेच स्पर्धा स्थळी ‘हॅशटॅग कोल्हापूर नशा मुक्त’ अभियानांतर्गत जनजागृती करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी उपस्थित सर्व क्रीडा शिक्षकांना ‘हॅशटॅग कोल्हापूर नशा मुक्त’ अभियानाची शपथ देण्यात आली. सभेला तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, आरती हाळीगळी, क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगले तसेच महावीर कॉलेजचे पर्यवेक्षक जावेद मेस्त्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पांडव यांनी केले, तर आभार प्रा. स्वप्नील खोत यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
81 %
8.2kmh
96 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page