Homeशैक्षणिक - उद्योग कंपनी सेक्रेटरी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी : सौ. कपिला टिक्के

कंपनी सेक्रेटरी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी : सौ. कपिला टिक्के

कोल्हापूर :
विद्यार्थ्यांनी आपली योग्यता आणि आवड जाणून भविष्यातील करिअर निवडावे आजच्या युगात वाणिज्य शाखेला अनन्यसाधारण महत्त्व आले असून कंपनी सेक्रेटरी करिअरमध्ये नानाविध संधी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना उज्वल करिअरसाठी सी.एस. हा उत्तम पर्याय आहे विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, असे मत सुप्रसिद्ध कंपनी सेक्रेटरी सौ. कपिला टिक्के यांनी व्यक्त केले.
विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित विद्यार्थी करिअर मार्गदर्शन व्याख्यानात त्या बोलत होत्या. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
त्या पुढे म्हणाल्या की, कंपनीला प्रोत्साहन देणे, सेक्रेटरी रेकॉर्ड ठेवणे, नियमांचे पालन करणे आणि कंपनीचा सर्वांगीण विकास करणे. हे उत्तम कंपनी सेक्रेटरीचे वैशिष्ट्य आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी केले. प्रा. सौ. शुभांगी पाटील आणि प्रा. सौ. अश्विनी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सौ. वर्षा महाडिक यांनी आभार मानले. ग्रंथालय हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page