Homeकला - क्रीडाआंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम चार वर्षात साकारणार

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम चार वर्षात साकारणार

• केडीसीएचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
कोल्हापूर :
कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा करार महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) यांच्यात २१ जुलैला मंत्रालयात झाला. यानुसार करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथे स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक ३२ एकर जमीन राज्य शासनाने केडीसीएला दिली आहे. तांत्रिक समितीच्यावतीने या स्टेडियमचा आराखडा तयार झाल्यानंतर ‘बीसीसीआय’ व ‘एमसीए’च्या सहकार्याने हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम चार वर्षात पूर्ण करू, अशी माहिती केडीसीएचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संभाजीराजे म्हणाले की, या करारामुळे कोल्हापूरच्या समृध्द क्रीडा परंपरेला एक नवी दिशा व चालना मिळणार असून त्यामुळे कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण व सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. ३५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियमवर क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामने पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. हे स्टेडियम आयसीसी व बीसीसीआय यांच्या निकषांनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत असे उभारण्यात येणार आहे. या स्टेडियम अंतर्गत आधुनिक पॅव्हेलियन, इनडोअर प्रशिक्षण सुविधा, सराव मैदान, स्पोर्टस सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लड लाईट, क्रिकेट म्युझियम, सौरउर्जा प्रकल्प व आधुनिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणेसाठी व प्रकल्प पुर्णत्वास नेणेसाठी कोल्हापूरातील नामांकित तज्ञ व अनुभवी अभियंता यांची तांत्रिक समिती गठण करण्यात येत असुन या समितीच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली प्रकल्प पुर्णत्वास नेणेचे नियोजन आहे. या स्टेडियममुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा पर्यटनाला व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. हे काम यशस्वीरित्या पुर्णत्वास होणेसाठी विकासवाडीचे ग्रामस्थ, स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी केडीसीए सभासदांसह सर्वांचे पाठबळ लाभले आहे.
याप्रसंगी केडीसीएचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर व ऋतुराज इंगळे, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूरचे उपसंचालक सुहास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. केडीसीएचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले यांनी संभाव्य स्टेडियमचे सादरीकरण केले. यावेळी केडीसीएचे सचिव मदन शेळके, खजिनदार शीतल भोसले, अजित मुळीक, डाॅ. संजय पाठारे, कृष्णा धोत्रे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page