Homeशैक्षणिक - उद्योग शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी : डॉ....

शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी : डॉ. संपत खिलारी

कोल्हापूर :
शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना ही गरजू, होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. वडणगे तालुका करवीर येथील शिवसाई कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या विद्यार्थी दत्तक योजनेतील शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील, सरोज कास्टींगच्या डायरेक्टर सौ. छाया अजित जाधव उपस्थित होत्या.
वडणगे येथील शिवसाई मंडळाने २४ वर्षांपूर्वी गणेश उत्सवातील खर्चाला फाटा विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली. या योजनेतील २५ विद्यार्थ्यांना यंदा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सरोज कास्टिंग्सचे अजित जाधव यांचे यासाठी सहकार्य लाभले.
डॉ. संपत खिलारी पुढे म्हणाले की, जीवनात मदतीची भावना ठेवा. अभ्यासू वृत्ती ठेवा. सर्वोत्तम बनण्याचे ध्येय ठेऊन प्रयत्न करा, यश मिळेल.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील म्हणाल्या की, शिक्षणासाठी मदत हेच खरे दान आहे. यामुळे कुटुंब, समाज आणि देश बलशाली होतो. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
सरोज कास्टिंग डायरेक्टर छाया जाधव यांनी सांगितले की, शिवसाई मंडळाचे कार्य आदर्शवत असून इतर मंडळांनी नक्कीच त्याचे अनुकरण करावे. या विधायक उपक्रमात आम्हाला सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद आहे.
या उपक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी शिवसाई मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. मंडळाने गेल्या २४ वर्षात ३२५ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहेत. या उपक्रमातील विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहेत. आपण जर एखादे विधायक काम सुरू करून ते चिकाटीने आणि सातत्याने पुढे नेले तर समाजातील दातृत्वाचे अनेक हात मदतीसाठी पुढे येतात, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, उपाध्यक्ष आर. एस. पाटील, संचालक राजाराम अस्वले, आण्णासाहेब देवणे , युवराज शेलार, विलास कुंभार, उद्योगपती  शिवाजीराव पाटील, सरोज कास्टिंगचे एचआर हेड अमेय पार्टे, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील, रणजीत कल्याणकर, रवी मोरे, शिवसाईचे अध्यक्ष अक्षय पाटील, संभाजी चव्हाण, योगेश माने, विक्रम पाटील, प्रदीप चौगले यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. के. व्ही. इरुडकर यांनी सूत्रसंचालन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
69 %
2.8kmh
0 %
Tue
30 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
32 °
Sat
31 °

Most Popular

You cannot copy content of this page