• कृषी अभियांत्रिकीच्या ६९ विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण
कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागच्या अंतिम वर्षाच्या ६९ विद्यार्थ्यांनी चार ते सहा महिन्यांचे अनिवार्य औद्योगिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. देशातील नामांकित उद्योग, कृषी कंपन्या, संशोधन संस्था आणि कृषी व्यवसायांमध्ये प्रशिक्षण घेत विद्यार्थ्यांनी उद्योगविश्वातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळविला.
या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध नामांकित उद्योग, कृषी कंपन्या, संशोधन संस्था आणि उद्योजकांकडे प्रशिक्षण घेतले. अॅग्रीनेक्सट कन्सल्टन्सी, बायफ फाउंडेशन, मॅप्रो फूड्स, सह्याद्री फार्म्स, महिंद्रा ट्रॅक्टर्स, सोनालिका ट्रॅक्टर्स, गोकुळ दूध संघ, डब्ल्यूओटीआर, वनराईसह सुमारे २४ उद्योग व संस्थांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. कृषी यंत्रसामग्री, सिंचन व्यवस्था, कृषी प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट शेती, संशोधन व विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष काम करत उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात केली. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान ३ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनही मिळाले.
विभागप्रमुख डॉ. मंगल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण व प्लेसमेंट समन्वयक डॉ. अमोल घाडगे, विभागातील प्राध्यापक तसेच विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलचे विशेष योगदान लाभले.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी घेतला उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28
°
C
28
°
28
°
82 %
12.1kmh
83 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

