• डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्यावतीने आयोजन
कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्या वतीने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सतेज मॅथ्स’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत असीम निरंकारी आणि अथर्व पाटील यांनी प्रथम क्रमांक (विभागून) पटकावला.
अभियांत्रिकी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी गणित विषयाचे महत्व जाणून घेऊन आणि तार्किक विचारशक्ती विकसित करण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्यावतीने गेल्या दहा वर्षापासून ‘सतेज मॅथ्स’ परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी जिल्ह्यातील २,८०० विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती.
या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार नामांकित करण्यात आले. यामध्ये असीम निरंकारी आणि अथर्व पाटील प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त केला. तर श्रेयश पाटील आणि श्री किल्लेदार (विभागून) द्वितीय क्रमांक आणि अवधूत पाटील आणि साक्षी वाईंगडे यांनी (विभागून) तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याना अनुक्रमे पंचवीस हजार, पंधरा हजार आणि दहा हजार व सन्मान चिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा. सुयोग पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डीवायपी साळोखेनगरचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा. वनश्री शिंदे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेत असीम निरंकारी, अथर्व पाटील प्रथम
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31
°
C
31
°
30.9
°
70 %
4.6kmh
78 %
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

