कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधील ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट (एमबीए- एबीएम) च्या २९ विद्यार्थ्यांची नामांकित राष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे.
विद्यापीठाचा तेजस चव्हाण याला बायर क्रॉप सायन्स प्रा. लि.मध्ये ५ लाख रुपयांचे तर विशाल पाटील याला बोरगावे इंडस्ट्रीज प्रा. लि.मध्ये ४.७० लाख वार्षिक पॅकेज मिळाले आहे. झायडेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि.मध्ये श्वेता कुमारी, ओम पवार व युवराज काटकर तर व्ही-एक्सप्रेस प्रा. लि. मध्ये व्यंकटेश माने, प्रथमेश खटावकर, शिवांजली जाधव, वृषाली जाधव व अंजली माळी यांना प्रत्येकी ४ लाखाचे पॅकेज मिळाले आहे.
डी-मार्टमध्ये ओंकार जाधव, संकेत पाटील, ऋषिकेश पाटील, सिद्धार्थ वाघमारे, समृद्धी मगर, केदार जंगम, रोहित पाटील, स्नेहल पाटील, ऋतुजा मगदूम व सूरज जगताप याना तर प्लांटप्रो सायन्स प्रा. लि.मध्ये प्रशांत मुंडे, एचडीएफसी बँकेमध्ये कार्तिक चांदुरे, रामकृष्ण गलवे, ऋषिकेश जगताप व शिवम चिले यांना (प्रत्येकी ३.५० लाख) त्याचबरोबर अदामा इंडिया प्रा. लि. मध्ये सौरभ दळवी, संस्कृती साळगावकर न्यूट्रीमॅक्स ॲग्रोमध्ये प्रतीक पवार, देहात ग्रीन ॲग्रो रेव्होल्युशनमध्ये वृषभ जमदाडे ( प्रत्येकी ३ लाख) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता प्रा. डॉ. मुरली भूपथी, विभागप्रमुख डॉ. शुभांगी जगताप, डॉ. रणजित पाटील, डॉ. शत्रुघ्न भुसनर यांनी अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या ‘ॲग्रीबिझनेस’च्या २९ विद्यार्थांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31
°
C
31
°
30.9
°
70 %
4.6kmh
78 %
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

