Homeइतरकेंद्रीय शासकीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रूग्णालयांचा समावेश

केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रूग्णालयांचा समावेश

• खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर :
केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेचे केंद्र कोल्हापुरात सुरू व्हावे, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात होती. खासदार महाडिक यांनी त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, कोल्हापुरातील दोन खासगी रूग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन लाखापेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार लाभ होणार आहे.
याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी केंद्रीय शासकीय आरोग्य योजना म्हणजेच सीजीएचएस योजना सुरू आहे. मात्र या योजनेतून औषधोपचार करण्याची सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने, अनेक आजारी कर्मचार्‍यांना पुण्या-मुंबईकडे जावे लागायचे. त्यातून आरोग्य सुविधा खर्चिक आणि वेळखाऊ बनली होती. त्यामुळे कोल्हापुरात केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आरोग्य योजना कार्यान्वित व्हावी,  यासाठी अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेने, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर खासदार महाडिक यांनी या योजनेबद्दल संसदेत आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. २१ डिसेंबर २०२२ रोजी, खासदार महाडिक यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल शिंदे, संजय पठाडे, राजेश सारंग यांच्या शिष्टमंडळासह, तत्कालिन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली. त्यानंतर २ मे २०२३ रोजी खासदार महाडिक यांनी संसदेत हा प्रश्‍न मांडला. या सर्व प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला आता यश आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेसाठी छत्रपती ताराराणी चौकातील सेलक्युअर कॅन्सर सेंटर आणि शिवाजी पार्कातील सनराईज हॉस्पिटलचा समावेश झाला आहे.
त्याबद्दल आज अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेने, खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी आनंद भोगडे, मोरेश्‍वर देशपांडे, अभिलाष पोवार, गोपाळ देशपांडे, वल्लभ मैंदरकर, राजेंद्र पाटील, आनंद बुगडे, जोत्स्ना माकणकर, देवेंद्र कवडे, साक्षी बचाटे, प्रतिक्षा पाटील, रूपाली तांबवेकर उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page