कोल्हापूर :
प्रशासकीय कामकाजात गतिमानता यावी, नागरिकांची कामे भ्रष्टाचार विरहित व्हावीत या उद्देशाने शासनाने ६७ सेवा ऑनलाइन कार्यरत केल्या आहेत. या सेवांबाबतीत मनपाने विहित वेळेत कार्यवाही करावी तसेच अर्ज प्रलंबित न ठेवता नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग (सेवानिवृत्त – भाप्रसे) यांनी दिले. श्री. तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त पारितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहा.आयुक्त राम काटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
ऑनलाईन सेवांच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेचे कामकाज समाधानकारक असल्याचे सांगून श्री. तेलंग म्हणाले, केवळ सेवा (अर्ज) ऑनलाईन न करता ते नोटिफाय करावे तसेच ऑनलाइन अर्जामध्ये त्रुटीच निघू नयेत याची संबंधित व्यक्ती अथवा विभागाने दक्षता घ्यावी. ऑनलाइन अर्जाच्या अनुषंगाने नागरिकांच्या प्रतिसादाबाबत मनपामध्ये अभिप्राय कक्ष सुरू करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी याप्रसंगी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेत ६८ ऑनलाईन सेवांची सुविधा असून सध्या या सेवांपैकी ५६ सेवा ऑनलाईन तर १२ सेवा ऑफलाइन असल्याची माहिती मनपा आयुक्त राजेंद्र भारूड यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी शहरातील नागरिकांसाठी सेवा बोर्ड ओपन ठेवला असल्याचे शिल्पा दरेकर यांनी सांगितले तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती पीपीटीद्वारे सादर केली.
यावेळी उप-सचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी अनुक्रमे रंजना गवारी, शिल्पा पुरोहित, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर,जल अभियंता हर्षजीत घाटगे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, यशपालसिंह रजपूत, परवाना अधिक्षक अशोक यादव, सहा.अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता, अभिलाषा दळवी, पदमल पाटील आदी उपस्थित होते.
——————————
शासनाच्या ऑनलाइन सेवा नागरिकांना विहित वेळेत द्या : सुधाकर तेलंग
Mumbai
light rain
28
°
C
28.9
°
28
°
78 %
5.1kmh
41 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

