Homeशैक्षणिक - उद्योग उपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.

उपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. निवास यशोदा संभाजी माने यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत व्यवस्थापन शास्त्र विषयांतर्गत ‘उच्च शिक्षण संस्थांमधील संगणकीकरण आणि ईआरपी प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर डॉ. चिंतामणी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला.
निवास माने हे प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रशासन व परीक्षा विभागातील अनेक संगणक प्रणालींच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, ओपीडीसी, शिव दीक्षांत आणि एसआरपीडी यांसारख्या प्रणालींच्या निर्मिती व अंमलबजावणीत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. या प्रणालींमुळे विद्यापीठातील कामकाज अधिक गतिमान झाले असून वेळ, श्रम आणि निधी यांची मोठी बचत झाली आहे.
त्यांना संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. केदार मारूलकर तसेच परीक्षा संचालक डॉ. अजित जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28.9 °
28 °
78 %
5.1kmh
41 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page