• डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने वडणगे येथे शेतकरी मेळावा
कोल्हापूर :
पिकांच्या मुळांवर प्रादुर्भाव करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करणाऱ्या ‘हुमणी’च्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी केले. तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने वडणगे (ता. करवीर) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
डॉ. मोहिते यांनी हुमणी किडीची ओळख, जीवनचक्र, प्रादुर्भावाची लक्षणे तसेच नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रौढ भुंगे पकडणे, शेतातील स्वच्छता राखणे, वेळेवर मशागत करणे, प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, जैविक व रासायनिक उपायांचा शिफारशीनुसार अवलंब करणे आदी बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.
मेळाव्यामध्ये कृषी विषयाशी संबंधित २० स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषीपूरक उद्योग, जैविक उत्पादने, कृषी मोबाईल ऍप्स तसेच विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. मेळाव्यास परिसरातील सुमारे ४०० शेतकरी उपस्थित होते.
यावेळी माजी जि. प. सदस्य बी. एच. पाटील, महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय. व्ही. पाटील. प्रा. ओ. व्ही. बेंद्रे व प्रा. श्वेता मयेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सर्व कृषीदुत व कृषीकन्या यांनी नियोजन केले. प्रास्ताविक डॉ. एस. एम. घोलपे यांनी केले. सूत्रसंचालन कृषीकन्या योगिता रणणावरे हिने तर आभार डॉ. एस. आर. पाटील यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————
एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे ‘हुमणी’वर नियंत्रण शक्य : डॉ. मोहिते
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.7
°
C
28.7
°
28.7
°
77 %
8.8kmh
91 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°

