कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह–२०२६ उत्साहात संपन्न झाला. फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शैक्षणिक संस्था आणि औषधनिर्माण उद्योग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.
या कॅम्पस ड्राइव्हला विविध फार्मसी महाविद्यालयांतील ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६३ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग नोंदविला. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची एमबी केमिकल्स, ग्रुप फार्मास्युटिकल्स, ग्लेनमार्क, फायझर आणि झायडस फार्मा या आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग तसेच सेल्स अँड मार्केटिंग विभागासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गोवा व पुणे येथील कंपनीच्या प्रकल्पांमध्ये संधी मिळाल्या आहेत.
कंपन्याच्यावतीने ब्रजमोहन अग्रवाल, प्रदीप देसाई, साहिल पाटील, नंदकुमार पाटील, निलेश राऊत आणि विठ्ठल खराडे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कौलगे आणि डॉ. सोनाली दिवटे यांनी केले तर आभार डॉ. अभिनंदन पाटील यांनी मानले. नियोजन व समन्वय महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख आशुतोष पी. कांबळे यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवड
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.7
°
C
28.7
°
28.7
°
83 %
7.3kmh
100 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°

