Homeशैक्षणिक - उद्योग रक्त तपासणीतून कर्करोगाचे लवकर निदान शक्य

रक्त तपासणीतून कर्करोगाचे लवकर निदान शक्य

• रिलायन्सच्या स्ट्रँड लाइफ सायन्सेसला भारतीय पेटंट
कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी स्ट्रँड लाइफ सायन्सेसला केवळ रक्ताच्या नमुन्याच्या आधारे कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्यास आणि त्याचा संभाव्य उगम शोधण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानासाठी भारतीय पेटंट मिळाले आहे. हे प्लॅटफॉर्म सेल-फ्री डीएनएचे विश्लेषण करते. यामध्ये जीनोम सिक्वेन्सिंग, जैविक माहितीचे (बायोलॉजिकल डेटा) विश्लेषण आणि मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगाशी संबंधित डीएनए नमुन्यांमधील (पॅटर्नमधील) बदल अचूकपणे ओळखणे. त्यामुळे कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होण्यास मदत होऊ शकते आणि रुग्णांना वेळेत प्रभावी उपचारांची संधी मिळू शकते. सध्या अनेक रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतरच होत असल्याचे दिसून येते.
स्ट्रँड लाइफ सायन्सेसचे सीईओ रमेश हरिहरन म्हणाले की, हे पेटंट कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञानाच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कर्करोग तपासणी अधिक अचूक, मोठ्या प्रमाणावर राबवता येण्याजोगी आणि सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
70 %
7.7kmh
83 %
Fri
31 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page