Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इन्स्टिट्यूट येथे उन्हाळी परीक्षामध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल

घोडावत इन्स्टिट्यूट येथे उन्हाळी परीक्षामध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल

कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये इन्स्टिट्यूटचा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे. या इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा  एकूण २९ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या परीक्षेमध्ये सर्व विभागांमधून मिळून एकूण ३८ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले. विशेष म्हणजे ५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण इंजिनिअरिंग मेकॅनिकस विषयामध्ये मिळवले. ४३४ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले. ३३२  विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला आहे.
तृतीय वर्ष सर्व विभागातून गुणवान विद्यार्थी मनाली पाटील ९७.२९%, श्रावणी नेवागे ९७.२४ %, ऐश्वर्या खोराटे ९५.७६%. द्वितीय वर्ष कल्याणी यादव ९३.७६%, आदिती वड्ड ९२.००., आदिती देसाई ९१.८८%. प्रथम वर्ष सर्व विभाग: संजना घुले ९४.११%,  आदित्य वड्ड ९०.११%,  आरमान कादरी ९०.००%  अशी माहिती पॉलिटेक्निक अकॅडमिक डीन प्रा. रवींद्र धोंगडी यांनी दिली आहे.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभ्यासक्रमाच्या पाच विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळविले आहे. या परीक्षेत प्रदीप देसाई यांनी ८०.१८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, चैत्रेश जाधव यांनी ८०.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर समीक्षा जोशी आणि सुरज चिखले यांनी प्रत्येकी ७९.५५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे अशी माहिती विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी दिली.
संचालक डॉ. विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
81 %
8.1kmh
100 %
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
31 °

Most Popular

You cannot copy content of this page