Homeइतरब्राह्मण सभा करवीरतर्फे श्री राम कथा आणि श्री राम यज्ञाचे आयोजन

ब्राह्मण सभा करवीरतर्फे श्री राम कथा आणि श्री राम यज्ञाचे आयोजन

कोल्हापूर :
अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम कोल्हापूर तर्फे श्रीराम कथा आणि श्री राम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील निरूपण समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी हे आपल्या रसाळ वाणीतून सुश्राव्य राम कथा साकारणार आहेत. तसेच ह.भ.प. गोविंद मांडवगणे हे संहिता वाचन करणार आहेत. दि. २२ ते २८ जून दरम्यान दररोज संध्याकाळी ४ ते ८:३० या वेळेत राम गणेश गडकरी हॉल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पेटाळा येथे श्रीराम कथा निरूपण होणार आहे, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.
ते म्हणाले की, संपूर्ण कार्यक्रमांमध्ये
२१ जून रोजी ग्रंथ दिंडी निघेल. वारकरी विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी सकाळी ९ वाजता मंगलधाम येथून निघून महाद्वार रोड, पापाची तिकटी, दक्षिणद्वार मार्गे पुन्हा मंगलधाम येथे संपणार आहे. या दिंडीमध्ये हणबरवाडी येथील माऊली भक्त वारकरी विद्यालयाच्या ४० बालचमूंचा समूह सहभागी होणार आहे.
२२ जूनला कुशलव रामायण गाती, २३ रोजी अयोध्या वर्णन व श्री राम जन्म, २४ जूनला योगवशिष्ठ, श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचे विवाह आणि अयोध्येत राज्याभिषेकाची तयारी, २५ रोजी श्रीराम वनाभिगमन केवट, २६ रोजी अगस्ती – श्रीराम भेट, पंचवटी सीता हरण २७ जूनला शबरी सुग्रीव मैत्री सुंदरकांड आणि २८ जून रोजी रावण वध श्रीराम राज्याभिषेक आणि त्यानंतर महाप्रसाद होईल.
तसेच शुक्रवार दिनांक २६ जून रोजी सकाळी नऊ वाजता मंगलधाम येथे श्रीराम यज्ञ होणार आहे. तरी या पर्वणीचा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सभा करवीरच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष किरण  धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडिलकर, संतोष कोडोलीकर, अशोक जोशी आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page