कोल्हापूर :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए), पुणे यांच्या वतीने सन २०२६-२७ हंगामासाठी कोल्हापूरचे सुरज जाधव यांची महाराष्ट्र १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षक (फिल्डिंग कोच) म्हणून सलग दुसऱ्या वर्षी निवड करण्यात आली आहे.
गेल्या हंगामात सुरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र १९ वर्षांखालील महिला संघाने एकदिवसीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षण आणि क्षेत्ररक्षण कौशल्य विकासामुळे संघाच्या यशात महत्त्वाचा वाटा राहिला होता.
सुरज जाधव हे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (केडीसीए) माजी खेळाडू असून त्यांनी केडीसीएच्या १४, १६, १९ वर्षांखालील तसेच खुल्या गटाच्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्राच्या १७ व १९ वर्षांखालील संघांसह शिवाजी विद्यापीठाच्या संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या ते कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे त्यांची २५ वर्षांखालील पश्चिम विभागीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती. तसेच जानेवारी २०२५ मध्ये मुंबई येथे झालेल्या आयएसपीएल टी-१० सिझन-२ स्पर्धेत केव्हीएम बेंगळुरू स्ट्रायकर्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
याशिवाय सन २०२६ मध्ये आयएसपीएल टी-१० च्या तिसऱ्या हंगामासाठी दिल्ली सुपरहिरोज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदीही त्यांची निवड झाली होती. गेली १४ वर्षे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून क्रिकेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुरज जाधव यांनी कोल्हापूरच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्राचा गौरव वाढला असून क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
——————————
महाराष्ट्र १९ वर्षांखालील महिला संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी सुरज जाधव यांची फेर निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

