Homeसामाजिकअनिल लाखे यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

अनिल लाखे यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

कोल्हापूर :
कोल्हाटी-डोंबारी समाजासह विविध समाजघटकांतील वंचित, गरजू आणि दुर्बल व्यक्तींच्या उन्नतीसाठी अनिल लाखे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेने त्यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
किसन वीर महाविद्यालय, वाई येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर अनिल लाखे यांना सासवड येथे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अनिल लाखे यांनी अनेक वर्षांपासून समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गायन, अभंगगायनाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आजवर मराठी भाषा गौरवदिनानिमित्त अनेक कार्यक्रमामध्ये मराठी गीतांचे सादरीकरण केले. मराठी साहित्य संमेलनामध्ये गायलेल्या गीताबद्दल त्यांना स्व. डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.  समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, शिक्षणाचे महत्त्व तसेच सामाजिक एकोपा यांसारख्या विषयांवर ते सातत्याने जनजागृती करीत असतात.
श्री. लाखे यांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पाली भाषेतून पदवी संपादन केली असून ते पुढे नोकरी करीत आपले पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांना संशोधनाची प्रचंड आवड आहे. रसायनशास्त्र विभागात ते प्रयोगशाळेत नाविन्यपूर्ण गोष्टींचा वेध घेत असतात.
अनिल लाखे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
29.3 ° C
29.3 °
29.3 °
68 %
1.6kmh
68 %
Mon
29 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page