• नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने शहरातील सर्व महापालिकेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रवेशाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये सजविलेल्या छोट्या डबलडेकर बसमधून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली, तर काही ठिकाणी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर शाळा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. नवीन मित्र, नवीन पुस्तके आणि आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. सुरुवातीला रडणारी मुलेही प्रवेशोत्सवातील आनंदी वातावरणामुळे लवकरच शाळेच्या वातावरणात मिसळून गेली.
प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने शाळा भेटींचे विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शाळांच्या गरजा व समस्यांची माहिती घेत मार्गदर्शन केले.
महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मनपा ल. कृ. जरग विद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिरोळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त किरण धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, शांताराम सुतार तसेच इतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. नशेचे दुष्परिणाम समजावून सांगत निरोगी आणि सुसंस्कृत जीवनाचा संदेश देण्यात आला. नवीन शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला प्रवेशोत्सव विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरला.
महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

