Homeकला - क्रीडारवी, जिनपॉल सोना, ऋषिका नंदी, इलिशा पाल यांचा अंतिम फेरीत प्रवेश 

रवी, जिनपॉल सोना, ऋषिका नंदी, इलिशा पाल यांचा अंतिम फेरीत प्रवेश 

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) यांच्या वतीने  आयोजित ‘व्ही.व्ही. नातू मेमोरियल योनेक्स – सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन २०२६ स्पर्धेत पुरुष गटात हरियाणाच्या रवी, दिल्लीच्या जिनपॉल सोना यांनी तर, महिला गटात दिल्लीच्या ऋषिका नंदी, कर्नाटकाच्या इलिशा पाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत एकेरीत पुरुष गटात अव्वल मानांकित दिल्लीच्या जिनपॉल सोना याने कर्नाटकच्या भार्गव एसचा ११-९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सोना सामन्यात पहिल्या सेटमध्ये ११-९ अशा फरकाने आघाडीवर असताना भार्गवचा गुडघा दुखू लागल्याने त्याने माघार घेतली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या रवी याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या कौशल धर्मामेरचा २१-११, १६-२१, २१-१८ असा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. महिला गटात उपांत्य फेरीत दिल्लीच्या ऋषिका नंदी हिने सोळाव्या मानांकित पारुल चौधरीचा २१-१९, १६-२१, २१-१५ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. बाराव्या मानांकित कर्नाटकच्या इलिशा पाल हिने तेलंगणाच्या वेण्णाला केचे आव्हान ९-२१, २१-०९, १६-०७ असे संपुष्ठात आणले.
दुहेरीत मिश्र गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या सिमरन सिंघी हिने चंदीगढच्या आयुष मखिजाच्या साथीत तामिळनाडूच्या विमलराज ए. व श्रेया बालाजी यांचा २१-१५, १२-२१, २१-१५ असा तर, दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित  नितीन कुमार व लिखिता श्रीवास्तव यांनी तामिळनाडूच्या पाचव्या मानांकित धिलेपन व्ही. व प्रणवी एन. यांचा २२-२०, १४-२१, २१-१४ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page