Homeइतरआर्किटेक राजकुंवर नायक यांचा ओडिसा येथे दोन पुरस्कारांनी सन्मान

आर्किटेक राजकुंवर नायक यांचा ओडिसा येथे दोन पुरस्कारांनी सन्मान

कोल्हापूर :
द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस – ओडिशा चॅप्टर तर्फे आर्किटेक के. बी. महापात्र पुरस्कार “आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन फॉर आर्किटेक्चर प्लॅनिंग अँड एज्युकेशन” व दे इंडियन काँक्रिट इन्स्टिट्यूट – भुवनेश्वर सेंटरचा अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने “लाइफटाइम अचीवमेंट-आदित्य बिर्ला अल्ट्रा टेक एंडोमेंट अवार्ड फॉर “काँक्रिट कंस्ट्रक्शन मध्ये उत्कृष्ट योगदान” ह्या महत्त्वाच्या दोन पुरस्कारांनी आर्किटेक श्रीमती राजकुंवर नायक यांना ओडिसातील उत्तम कार्यासाठी सन्मानित केले.
आर्किटेक्ट के. बी. महापात्र हे एक अत्यंत आदरणीय शैक्षणिक संस्थापक व काउंसिल ऑफ आर्किटेक्चरचे प्रेसिडेंट होते. त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात आला असून ओडिशा राज्यात आर्किटेक्चरच्या क्षेत्रात हा अत्यंत सन्मानीय आणि उच्च पुरस्कार मानला जातो. आदित्य बिर्ला ग्रुपचा “लाइफटाइम अचीवमेंट – इंडोवमेंट अवार्ड” हा ही एक खुप महात्वपूर्ण सन्मान विशेष कार्यासाठी दिला जातो.
कोल्हापूर कन्या प्रोफेसर आर्किटेक्ट राजकुंवर नायक ह्या ३२ वर्षे जगन्नाथ भूमि-ओडिशा राज्यामध्ये आर्किटेक्ट शिक्षण क्षेत्रात व अर्बन प्लानिंग क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करत आहेत. ओडिशाच्या इन्फ्रास्ट्रक्टर डेव्हलपमेंटसाठी शहरी योजना विशेषज्ञ म्हणून त्यांचा बराच वाटा आहे.
त्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या एक्सपर्ट मेंबर असून आर्कएशियन अकॅडमिक काउन्सिलच्या ही मेंबर आहेत. त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या “वूमन एम्पॉवरमेंट कमिटीच्या” प्रेसिडेंट आहेत. त्यांनी ओडिशा मधील नामी संस्था पिलू-मोदी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये फाऊंडर फॅकल्टी व अकॅडमिक एक्सपर्ट असून श्री श्री रविशंकर युनिव्हर्सिटी इथे डीन व संचालक म्हणून काम केले आहे.
त्या ओडिसा येथे छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराज यांना आदर्श मानून काम करत असून छत्रपती ताराराणी यांचा धडाडीचा वारसा जपण्याचा प्रयत्न आर्किटेक्ट या क्षेत्रातून करत आहेत.
त्यांचा या दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल थोड्याच दिवसात आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर येथे सत्कार सोहळा करण्यात येणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
31 ° C
31 °
31 °
74 %
2.6kmh
20 %
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page