Homeकला - क्रीडामुद्दसर मुल्ला बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ कोर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

मुद्दसर मुल्ला बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ कोर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)चे खेळाडू तसेच वरिष्ठ गट निवड समितीचे सदस्य मुद्दसर मुल्ला यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमी (बीसीसीआय) मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन लेव्हल ‘ओ’ कोर्स प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.
मुद्दसर मुल्ला हे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू असून त्यांनी केडीसीएच्या जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या १७ व १९ वर्षांखालील संघाचे आणि शिवाजी विद्यापीठाच्या संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या ते कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशिक्षक तसेच वरिष्ठ गट निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेली दहा वर्षे ते खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून कोल्हापूरमध्ये क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल क्रिकेट क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
——————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
16 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page