“द कोल्हापुरी” पुस्तकाचा जागतिक स्तरावर सन्मान
कोल्हापूर :
कोल्हापूरातील कलापुरी आणि व्ही.एम.एल. या मीडिया एजन्सीच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “द कोल्हापुरी” या पुस्तकाला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे झालेल्या समारंभात या पुस्तकाने तब्बल ११ “क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स” पटकावले. यामध्ये सर्वोच्च मानला जाणारा “ब्लॅक एलिफंट” पुरस्कारही मिळाला आहे, अशी माहिती प्रा. श्रीधर वैद्य, संस्थापक कलापुरी सौ. अपर्णा चव्हाण, आतिष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सौ.अमृता काळे उपस्थित होत्या.
कोल्हापुरी चप्पलांच्या हजार वर्षांच्या इतिहासासह कारागिरांच्या कलेचे दस्तऐवजीकरण या पुस्तकातून करण्यात आले आहे. मिलान फॅशन वीक २०२५मध्ये प्राडाने कोल्हापुरी चप्पलशी साधर्म्य असलेल्या चपला सादर केल्यानंतर कलापुरीने निषेधाऐवजी “द कोल्हापुरी” हे हस्तनिर्मित पुस्तक तयार करून या कलेचा वारसा जगासमोर मांडला.
या पुस्तकाला क्लिओ अवॉर्ड्स, D&AD व अँबीज अवॉर्ड्ससह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. तसेच द वन शो यांनी देखिल ‘द कोल्हापुरी’ या पुस्तकास पुरस्कार देऊन गौरविले आहे.
कलापुरी संस्थापक सौ. अपर्णा चव्हाण आणि आतिष चव्हाण यांनी ग्रामीण भागातील ५०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत पारंपरिक हस्तकलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
16 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page