कोल्हापूर :
कै. राम गणेश गडकरी सभागृहात रसिक प्रेक्षकांनी एक अनोखी अशी मैफिल अनुभवली. निमित्त होते जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई चॅरिटेबल ट्रस्ट, नादब्रह्म समूह आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त वैद्यमाने आयोजित संगीत मैफिलीच्या माध्यमातून संकटग्रस्त बंधू-भगिनींना सहकार्य करण्याचे.
अकॉर्डियन हे वाद्य सध्याच्या काळात फारच दुर्मिळ आहे. आजही बऱ्याच जणांना हे वाद्य माहीत नाही. परंतु पुण्याचे ज्येष्ठ वादक, ज्यांनी तलत मेहमूद, आर डी बर्मन, मन्ना डे, किशोर कुमार, वाणी जयराम, आशा भोसले यांच्या सोबत हजारो संगीत मैफिली गाजवल्या. अनिल गोडे यांनी अकॉर्डियनचा प्रवास तसेच स्वतःच्या वादनाचा प्रवास कोल्हापूरचे प्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक पंडित कंदले यांच्या समावेत हळुवारपणे रसिक श्रोत्यांसमोर मांडला. अत्यंत दर्दी अशा रसिक श्रोत्यांनी या संगीत मैफिलीचा पुरेपूर आस्वाद घेतला. तब्बल अडीच तास रंगलेली ही मैफिल अनिल गोडे यांच्या अकॉर्डियन वादनाने अविस्मरणीय ठरली.
सर्वप्रथम मीना विनोद लोहिया संगीत अकॅडमीचे विनोद कुमार लोहिया यांच्या हस्ते ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच तालसंगत देणारे पुण्याचे प्रसिद्ध वादक विनोद सोनवणे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
मैफिल सुरू झाली आणि अनिल गोडे यांच्या वादनाला साथ देत रसिक प्रेक्षकांनी स्वतः गाणी गुणगुणली. तू प्यार का सागर है, हर दिल जो प्यार करेगा, आवारा हू, बाबूजी धीरे चलना, आईये मेहरबान, ससा रे ससा, मेरे सपनोंकी रानी, रूप तेरा मस्ताना, प्यार हुआ इकरार हुआ, या गाण्यांसहित रसिक प्रेक्षकांकडून आलेल्या फर्माईशीसुद्धा अकॉर्डियन वाद्यावर अनिल गोडे यांनी सादर केल्या. यावेळी पंडित कंदले यांनी आपल्या सहज शैलीत अनिल गोडे यांची मुलाखत घेतली. आपल्या आयुष्यात घडलेले रंजक किस्से, महत्त्वपूर्ण घटना अनिल गोडे यांनी रसिकांसमोर मांडल्या.
गेली साठ वर्ष अनिल गोडे हे वादन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. व्यावसायिकता जपत असताना स्वतःमधील संवेदनशीलता न विसरलेला कलाकार, मानवते प्रती आस्था असलेला कलावंत म्हणून त्यांनी आपली कारकीर्द घडवली. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या सलग २६०८ दिवसातील सलग ३२७९ मैफिलीमध्ये वादन सादर करताना सुद्धा सुरांना मानवतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिलं. या मैफिलीस मीना विनोद लोहिया संगीत अकॅडमी यांचे तसेच ध्वनी संयोजक रमेश सुतार, रंगमंच व्यवस्थेसाठी मिलिंद अष्टेकर आणि सागर भोसले, छायाचित्रकार माधव बोरगावकर आणि पुष्कर बोरगावकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या मैफिलीतून जमा झालेला दहा हजार रुपयांचा निधी विनोद कुमार लोहिया आणि अभय देशपांडे यांच्या हस्ते जाणीव फाउंडेशनच्या संचालिका सुषमाताई बटकडली यांच्याकडे नव्या संकुलाच्या बांधकामासाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्त करण्यात आला. या मैफिलीस मीना विनोद लोहिया संगीत अकॅडमी यांचे सहकार्य लाभले. राजेंद्र चौगुले, मिलिंद नाईक, अमरसिंग राजपूत, रघुनाथ पाटील, नाना बोरगावकर, पुष्कर बोरगावकर, प्रशांत जोशी यांनी संयोजन केले.
——————————
अकॉर्डियनमधून बरसले मानवतेचे सूर
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31.2
°
C
31.2
°
31.2
°
70 %
7kmh
62 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°

