कोल्हापूर :
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या (वेट्रन) फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळवर ३-०ने एकतर्फी विजय मिळवला. तसेच संध्यामठ तरुण मंडळने शिवाजी तरुण मंडळवर १-०ने मात केली. या विजयासह दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (दि.२४) दुपारी चार वाजता पाटाकडील आणि संध्यामठ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.
दरम्यान, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे अंतिम सामना रंगणार असून, त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होईल. शिवसेना नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण तर जयेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. यावेळी डीवायएसपी अविनाश पवार, पांडुरंग वडगावकर, नगरसेवक विनायक फाळके, तलाठी गणेश पाटील, संपत जाधव आदींची उपस्थिती आहे.
शनिवारी (दि.२३) झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यांत संध्यामठने ‘शिवाजी’वर १-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात उत्तरार्धात अमोल सरनाईक याने गिरीष शहा यांच्या पासवर निर्णायक गोल नोंदविला. संध्यामठकडून संदीप भोसले, अमोल सरनाईक, चंद्रकांत जांभळे, अनिरुद्ध शिंदे आणि नंदकुमार जांभळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
‘शिवाजी’कडून संतोष तावडे, रमेश पाटील, निलेश कडव आणि अभिजीत पाटील यांनी चांगली झुंज दिली. उत्तरार्धात गैरवर्तन केल्यामुळे संग्राम शिंदे याला मुख्य पंच किरण साळोखे यांनी रेड कार्ड दाखविले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाटाकडीलने उत्तरेश्वरवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. पाटाकडीलकडून भरत पाटील याने पूर्वार्धात पहिला गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात शरद पवार आणि गजानन कुराडे यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाटाकडीलकडून अनिल शिंदे, धनंजय यादव आणि सैफ हकीम यांनी उल्लेखनीय खेळ केला. तर उत्तरेश्वरकडून इंद्रनील पाटील, संतोष सुतार, विकी खाडे आणि दशरथ सुतार यांनी अखेरपर्यंत गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले. अखेर ३-० ची आघाडी राखत पाटाकडीलने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
——————————
पाटाकडील – संध्यामठ आज विजेतेपदासाठी लढत
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

