Homeकला - क्रीडाफुलेवाडीचा खंडोबावर निसटता विजय

फुलेवाडीचा खंडोबावर निसटता विजय

• शिवाजी – पाटाकडील आणि दिलबहार – प्रॅक्टीस सामने बरोबरीत
कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या (वेट्रन फुटबॉल) स्पर्धेत बुधवारी (दि.२०) झालेल्या सामन्यांमध्ये फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने स्वयंगोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळवर १-० गोलने निसटता विजय मिळवला. तर शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. तसेच दिलबहार तालीम मंडळ आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्यातील सामनाही गोलशून्य बरोबरीत सुटला.
सकाळच्या सत्रात झालेल्या शिवाजी विरुद्ध पाटाकडील सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, दोन्ही संघांच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी केल्याने सामना अखेर गोलशून्य बरोबरीत संपला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुणावर समाधान मानावे लागले. सामन्याच्या पूर्वार्धात ‘शिवाजी’च्या अभिजीत चव्हाण याने गोलक्षेत्रात प्रतिस्पर्धी खेळाडूला अवैधरित्या रोखल्याबद्दल मुख्य पंच रिची फर्नांडिस यांनी पाटाकडीलला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. मात्र, विनायक चौगुले याने घेतलेला फटका गोलपोस्टच्या बाहेर गेल्याने पाटाकडीलची आघाडी घेण्याची संधी हुकली.
दुपारच्या सत्रातील दिलबहार आणि प्रॅक्टीस क्लब यांच्यातील सामना देखील चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी अनेक आक्रमणे रचली, मात्र कोणालाही गोल करण्यात यश आले नाही आणि सामना गोलशून्य बरोबरीत संपला. दिलबहारकडून सचिन पाटील, अभिजीत शिंदे, सागर हुजरे आणि मिलींद शिंदे यांनी प्रभावी खेळ केला. तर प्रॅक्टीस क्लबकडून निलेश काळे, सुनील मुळीक आणि रोहन खिरुगडे यांनी चमकदार कामगिरी बजावली. सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
खंडोबा आणि फुलेवाडी यांच्यातील सामना चुरशीने खेळला गेला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूकडून झालेल्या स्वयंगोलाचा फायदा घेत फुलेवाडीने १-० अशी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखत विजय संपादन केला. खंडोबाकडून मनोज सुतार, धर्मेंश मेढे आणि मनोज बालिंगेकर (शिंदे) यांनी चांगला खेळ केला. तर फुलेवाडीकडून अमर पाटील, संदीप साळोखे आणि विजय पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page