Homeकला - क्रीडाज्येष्ठ ऑकॉर्डियन वादक अनिल गोडे यांची शनिवारी मैफिल

ज्येष्ठ ऑकॉर्डियन वादक अनिल गोडे यांची शनिवारी मैफिल

कोल्हापूर :
जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाबाई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, नादब्रह्म समूह आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२३) संध्याकाळी ६:३० वाजता राम गणेश गडकरी सभागृहात ज्येष्ठ ऑकॉर्डियन वादक अनिल गोडे यांच्या ऍकॉर्डियन वादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मॅजिक ऑफ ऑकॉर्डियन या संगीत मैफिलीत अनिल गोडे यांचे ऑकॉर्डियन वादन आणि मुलाखत अशा स्वरुपात सादर होणार आहे.  प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार पंडित कंदले  हे अनिल गोडे यांची मुलाखत घेणार आहेत. तर कार्यक्रमाला साथ संगत विनोद सोनावणे यांची असेल. ध्वनी संयोजन रमेश सुतार यांचे असून रंगमंच व्यवस्था मिलिंद सागर हे सांभाळत आहेत.
अनिल गोडे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ आणि प्रतिभावान ऑकॉर्डियन वादक आहेत. ऑकॉर्डियन हे एक पाश्चात्य संगीत वाद्य आहे. ज्यावर भारतीय सुरावट वाजवणे अतिशय कठीण मानले जाते. अनिल गोडे यांनी या वाद्यावर प्रभुत्व मिळवून अनेक दशके रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी नवव्या इयत्तेत असल्यापासून ऑकॉर्डियन वादनास सुरुवात केली असून ही कलासेवा अखंडपणे सुरु आहे. वयाच्या ८०व्या वर्षी ऑकॉर्डियनच्या माध्यमातून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांची एकल मैफिल यशस्वीरित्या सादर केली आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी आणि “ऑकॉर्डियन वाद्य आणि वादन” जिवंत ठेवल्याबद्दल त्यांना विशेष जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आजवर तलत महमूद, किशोर कुमार, मन्ना डे, आर. डी. बर्मन, आशा भोसले, वाणी जयराम यांच्या देश विदेशात झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमधून आपल्या जादूई वादनाने रसिकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. ऑकॉर्डियन या दुर्मिळ वाद्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या ऑकॉर्डियन फॅन्स क्लबमधील ते एक प्रमुख आणि सक्रिय सदस्य आहेत. अशा प्रतिभावान ऑकॉर्डियन वादकाचा कार्यक्रम २३ मे रोजी कोल्हापूर होत आहे ही कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे.
संगीताचा हा सुरेल प्रवास आणि मनाला भिडणारा अनुभव घ्यायचा असेल तर प्रशांत जोशी 7720088814, अमरसिंह रजपूत 9822512351 आणि मिलिंद नाईक 9822352029 यांच्याशी तिकिटासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page