Homeइतरघरफाळा देयक वितरणास सुरुवात

घरफाळा देयक वितरणास सुरुवात

• चालू देयकावर सहा टक्के सवलत
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागामार्फत (घरफाळा) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरातील एकूण १ लाख ७१ हजार ९७८ मिळकतींची देयके तयार करण्यात आली असून, सदर देयकांचे पोस्ट विभागामार्फत वितरण सुरू करण्यात आले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील चालू मागणीवरील महापालिकेच्या घरफाळ्यामध्ये ६ टक्के सवलत योजना लागू करण्यात आली असून, शहरातील सर्व मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व मिळकतधारकांना आवाहन केले आहे की, घरफाळा देयक वितरणासाठी येणाऱ्या पोस्टमन यांना आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी परिपूर्ण माहिती द्यावी. या माहितीच्या आधारे महानगरपालिकेकडून घरफाळा सवलत योजना तसेच इतर महत्त्वाची माहिती मोबाईलद्वारे मिळकतधारकास सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील चालू मागणीवरील महापालिकेच्या घरफाळ्यामध्ये ६ टक्के सवलत योजना लागू करण्यात आली असून, शहरातील सर्व मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही जमा मिळकतधारकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जाऊन आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाचा घरफाळा भरता येणार असून, त्याद्वारे ६ टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारेही ऑनलाईन घरफाळा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन कर भरण्यासाठी:propertytax.kolhapurcorporaction.gov.in या लिंकचा वापर करावा असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
79 %
12.3kmh
100 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page