• पाटाकडीलवर मात करत अंतिम फेरीत धडक
कोल्हापूर :
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने पाटाकडील तालीम मंडळवर सडनडेथमध्ये मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत तसेच टायब्रेकरमध्ये ४-४ असा बरोबरीत राहिला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्याने प्रेक्षकांची उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. उपांत्य फेरीतील दुसरा सामना शुक्रवारी (दि.१५) शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता होईल.
छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत एकमेकांच्या गोलक्षेत्रावर सातत्याने चढाया केल्या. मात्र दोन्ही संघांचे गोलचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे निर्धारित वेळेत एकाही संघाला गोल करता आला नाही आणि सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. अखेरच्या क्षणी प्रणव कणसेने गोलची अत्यंत सोपी संधी दवडली. पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये वेताळमाळकडून शोएब बागवान, जय कामत, प्रणव कणसे आणि रेहान मुजावर यांनी अचूक गोल नोंदवले. मात्र योक्षिम अवुंगशी याचा फटका पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळीने रोखून धरला. पाटाकडील संघाकडून प्रथमेश हेरेकर, अरबाज पेंढारी, रोहित पवार आणि प्रतिक बदामे यांनी अचूक गोल केले. मात्र अमीन खझीरचा फटका वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणेने रोखत सामना ४-४ असा बरोबरीत ठेवला. त्यामुळे सामन्याचा निर्णय सडनडेथमध्ये घेण्यात आला.
सडनडेथमध्ये सामन्याने आणखी रंगत घेतली. वेताळमाळच्या सर्वेश वाडकरचा पहिलाच फटका पाटाकडीलचा बदली गोलरक्षक राहुल पोवारने रोखत आपल्या संघाच्या आशा उंचावल्या. त्यानंतर पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटीलचा फटका वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणेने अडवून पुन्हा सामना बरोबरीत आणला. या क्षणानंतर मैदानावरील आणि प्रेक्षकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली.
यानंतर वेताळमाळकडून विशाल कुरणे, आकाश मोरे, मणिकंदन मुरूगन आणि ऋतुराज सूर्यवंशी यांनी अचूक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पाटाकडीलकडून यशराज कांबळे, रोमारिओ आणि मोहम्मदशाहिद पटेल यांनी गोल करत जोरदार प्रतिकार केला. मात्र ओमकार मोरे याचा निर्णायक फटका वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणेने रोखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गोलरक्षक विशाल कुरणेने निर्णायक क्षणी केलेल्या उत्कृष्ट बचावामुळे वेताळमाळला हा संस्मरणीय विजय मिळवता आला. या विजयासह वेताळमाळने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
——————————
वेताळमाळचा सडनडेथवर थरारक विजय
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.8
°
C
27.8
°
27.8
°
83 %
11.3kmh
100 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

