Homeइतरपरिवहन समितीच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा

परिवहन समितीच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीची सभा मंगळवारी के.एम.टी. प्रधान कार्यालयातील सभागृहामध्ये झाली. परिवहन समितीचे सभापती सत्यजीत जाधव हे सभेस उपस्थित नसलेने, उपस्थित सदस्यांमधून प्रसाद धनाजीराव जाधव यांची ‘चेअरमन फॉर दि मिटींग’ म्हणून निवड करण्यात आली व त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.
विषयपत्रिकेवरील कंत्राटी चालक, कंत्राटी वाहक व कंत्राटी सुरक्षा जवान यांच्या कंत्राटी मुदतीमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.  माऊली चौक येथील के.एम.टी.साठी आरक्षित जागेचा प्रश्न दुर्वास कदम यांनी यावेळी उपस्थित केला. या जागेसंबंधी न्यायालयीन प्रकरणांची माहिती देण्यात आली. के.एम.टी. बस थांब्यावरील अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महत्वाच्या बस थांब्यांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याची सुचना हेमंत आराध्ये यांनी केली. मार्गावरील बस संख्येमध्ये वाढ करणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणणे, उत्पन्नामध्ये वाढ करणे इत्यादी बाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
यावेळी परिवहन समिती सदस्य उमेश पोवार, रोहन अतिग्रे, श्रीधर गाडगीळ, संतोष लाड, प्रशांत मोरे, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. या बैठकीस अति. परिवहन व्यवस्थापक डॉ. विजय पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, कायदा सल्लागार ॲड. मुकुंद पवार, वर्क्स मॅनेजर दिपक पाटील, प्रकल्प विभाग प्रमुख पी. एन. गुरव, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, वाहतूक निरिक्षक नितीन पोवार तसेच के.एम.टी.चे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
27 ° C
27 °
27 °
89 %
2.1kmh
13 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page