Homeइतरकोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राला गुणवत्ता प्रमाणपत्र

कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राला गुणवत्ता प्रमाणपत्र

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत आयसोलेशन येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. ७ या केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोल्हापूर परिमंडळातील नागरी आरोग्य केंद्र प्रकारातील असे प्रमाणपत्र मिळवणारी ही पहिलीच संस्था ठरली आहे.
शासनाकडून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन पडताळणी कार्यक्रम राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने सन २०२५-२६ व २०२६-२७ या कालावधीत महानगरपालिका अंतर्गत कार्यरत ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे.
या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त चेकलिस्ट नुसार चार टप्प्यांत मूल्यांकन केले जाते. यामध्ये स्वमूल्यांकन, जिल्हास्तरीय तपासणी, राज्यस्तरीय तपासणी आणि अंतिम राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनाचा समावेश असतो. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र. ७ आयसोलेशन या केंद्राचे राज्यस्तरीय मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय मूल्यांकनासाठी पात्रता मिळाली होती. त्यानुसार दि. २४ व २५ एप्रिल २०२६ रोजी एनएचएसआरसी दिल्ली यांच्या दोन सदस्यीय पथकाने केंद्राची पाहणी केली. या पथकात डॉ. संपतसिंह रंगावले आणि डॉ. कुमार भार्गव कप्तान यांचा समावेश होता.
केंद्र शासनाच्या निकषांनुसार १२ विभागांचे परीक्षण करण्यात आले. या मूल्यांकनात या केंद्राला ८३.४४ टक्के गुण मिळाले. तसेच राष्ट्रीय प्रमाणपत्रासाठी आवश्यक पाच मानांकन पूर्ण करण्यात यश आले. सदर संस्था राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवणारी कोल्हापूर परिमंडळातील नागरी आरोग्य केंद्र प्रकारातील पहिलीच संस्था ठरली आहे.
या यशासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, किरणकुमार धनवाडे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. प्रकाश पावरा यांचे नियोजन तसेच केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page