Homeकला - क्रीडापाटाकडीलची उपांत्य फेरीत धडक

पाटाकडीलची उपांत्य फेरीत धडक

• प्रॅक्टीस क्लबवर २-१ गोलफरकाने मात
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर २-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. सोमवारी (दि.११) वेताळमाळ तालीम मंडळ विरूध्द सम्राटनगर स्पोर्ट्स हा सामना दुपारी चार वाजता होईल.
छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाटाकडीलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला.
सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला यशराज कांबळेने दिलेल्या अचूक पासवर रोहित पवारने गोल करत पाटाकडील संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या जलद गोलमुळे पाटाकडीलच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि संघाने आक्रमक खेळ कायम ठेवला.
पूर्वार्धात दोन्ही संघांकडून वेगवान चढाया झाल्या. पाटाकडीलच्या ओमकार मोरेने कॉर्नर किकवर गोल करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रॅक्टीसचा गोलरक्षक कार्तिकने अप्रतिम बचाव करत संभाव्य गोल रोखला. त्यानंतरही ओमकार मोरेला मिळालेल्या काही सोप्या संधी हुकल्याने पाटाकडीलला आघाडी वाढवता आली नाही.
उत्तरार्धात पाटाकडीलने पुन्हा आक्रमणाची धार वाढवली. ५५व्या मिनिटाला ओमकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. यानंतर प्रॅक्टीसने गोलची आघाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. प्रॅक्टीसकडून एका चढाईत ६०व्या मिनिटाला आकाश बावकरने गोल करत सामन्यात चुरस निर्माण केली. त्यांच्या अजिंक्य नलवडे, मूमिन भाट, साहिल डाकवे, प्रदीप शिंदे, सचिन गायकवाड आणि प्रतिक बेडेकर यांनी आक्रमक खेळ करत गोल करण्याचे प्रयत्न केले; मात्र पाटाकडीलच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही.
पाटाकडीलकडून ओमकार मोरे, ऋषिकेश मेथे-पाटील, रोहित मंडलिक, रोमारिओ, प्रथमेश हेरेकर आणि यशराज कांबळे यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले. तसेच अमर गवळीने अप्रतिम गोलरक्षण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
35 ° C
35 °
33.9 °
59 %
6.2kmh
8 %
Mon
34 °
Tue
31 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page