Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळमध्ये कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा

गोकुळमध्ये कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे १ मे जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कामगार, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे कॉ. संजय सदलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी महाराष्ट्र राज्यगीत व राष्ट्रगीत सादर करून कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचा गौरव केला.
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना (आयटक) यांच्या वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल व कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळ प्रकल्पात आयोजित या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये ४०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबिराचे उदघाटन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड  सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, जनरल सेक्रेटरी सदाशिव निकम, अध्यक्ष मल्हार पाटील, दिलीप पोवार, शंकर पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, संभाजी शेलार, संदेश पाटील, योगेश चव्हाण, कृष्णा चौगले, अजित जाधव तसेच संघटनेचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page