Homeशैक्षणिक - उद्योग टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी

टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी

• प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थान
कोल्हापूर :
जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन एशिया २०२६ या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण व गुणवत्ता, आंतरराष्ट्रीयकरण, उद्योग- शिक्षण, सहकार्य या पंचसुत्रीवर आधारित असते. भारतातील एकूण सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत दहावे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक राज्य विद्यापीठांत दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ या सार्वजनिक राज्य विद्यापीठांचाच समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाने या मुल्यांकनामध्ये प्रथमच सहभाग नोंदवून या प्रतिष्ठित मुल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाला ३६ देशांतर्गत आशिया स्तरावरती ४०१–५०० या मानांकन बँडमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. या एशिया स्तरावरील पहिल्या ५०० मानांकनप्राप्त विद्यापीठांमध्ये भारतातील जवळपास ६६ भारतीय संस्था असून यामध्ये १९ भारतीय सर्वोच्च संशोधन संस्था, ०९ केंद्रीय विद्यापीठे, १० सार्वजनिक राज्य विद्यापीठे व २८ खाजगी / स्वायत्त विद्यापीठांचा समावेश आहे. या मुल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास भारतीय स्तरावर एकूण विद्यापीठांअंतर्गत १३ वी मानांकन बँड आणि सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत ५ वी मानांकन बँड प्राप्त झाली आहे.
पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे मानांकन विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीची साक्ष देणारी असून यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली आहे. हे अभिमानास्पद व ऐतिहासिक यश विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. सागर डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संविधानिक अधिकाऱ्यांचे पाठबळ, शिक्षकांचे सातत्यपूर्ण संशोधन व अध्यापन, विद्यार्थ्यांची एकूण गुणवत्ता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि इतर सर्व संबंधित घटकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. हे यश विद्यापीठासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्य व देशासाठी अभिमानास्पद ठरले आहे. या संदर्भात कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठातील सर्व घटकांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page