कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा २० वर्षाखालील मुलांची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा लोणावळा येथे होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (के.एस.ए.) चा कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ रवाना झाला आहे.
या संघाची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर छत्रपती शाहू स्टेडियमवर १२ ते २३ एप्रिल दरम्यान पार पडले. या शिबिरात खेळाडूंना तांत्रिक व शारीरिक तयारीसाठी कसून सराव करून घेण्यात आला. प्रशिक्षक विश्वंभर मालेकर, रविंद्र शेळके, युवराज पाटील, केतन आडनाईक आणि अनिल अडसूळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या संघात गोलरक्षक अविराज नितीन पाटील व पवन गंगाधर गुंठे असून खेळाडूंमध्ये रेहान समिर मुजावर, महम्मद मुस्ताफा फरास, प्रतिक हेमंत गायकवाड, सौरभ राहूल ढाले, मुदस्सर नबीलाल शेख, विराज विसास पाटील, स्वराज गणेश सावंत, अथर्व अजित पाटील, मयुर धीरज सुतार, सत्येन रमेश पाटील, प्रदीप विलास शिंदे, दिग्विजय जयदीप बसर्गे, ईशान राहूल तिवले, स्मित स्वप्निल पार्टे, गंधर्व गुंडा घाटगे, अभयसिंह भूषण पाटील याचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक म्हणून रविंद्र शेळके व संघ व्यवस्थापक म्हणून विश्वंभर मालेकर आहेत.
या संघाला के.एस.ए.च्या पेट्रन सौ. मधुरिमाराजे छत्रपती, जॉईंट जनरल सेक्रेटरी प्रा. अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या संघास केएसएचे पेट्रन-इन-चीफ् श्री शाहू छत्रपती महाराज, युवराज श्री. संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती त्याचप्रमाणे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले.
महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा अंडर-२० फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर संघ रवाना
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
27
°
C
27
°
27
°
89 %
3.1kmh
15 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°

