कोल्हापूर :
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने १२ ते १६ वर्षांखालील मुलांसाठी मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा आज सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. २१ एप्रिल ते २० मे २०२६ या कालावधीत हे शिबिर चालणार आहे. शिबिराचे उदघाटन राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू डॉ. मुक्ता पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आरोग्य दूध बंटी सावंत हे होते.
कोल्हापूरला लाभलेली समृद्ध फुटबॉल परंपरा जपत नव्या पिढीत खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच मुलांना तंत्रशुद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या २७ वर्षांपासून नियमितपणे आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराला यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना मूलभूत कौशल्ये, फिटनेस, तसेच खेळातील शिस्त यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिराच्या उदघाटनप्रसंगी डॉ. अभिजीत बेलेकर, नगरसेवक विनायक फाळके, संपत जाधव, महावीर मूग, उदय पाटील, किरण साळोखे, प्रमोद भोसले, महेश पाटील, सुशील गायकवाड आदींसह खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक अकॅडमीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील यांनी केले. यापूर्वी अशाप्रकारच्या शिबिराचा लाभ अनेक खेळाडूंना झाला आहे. आगामी काळात या शिबिरातून अनेक गुणी व उत्कृष्ट फुटबॉलपटू घडतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर उत्साहात सुरू
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
6 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

