Homeइतरदलितमित्र दिनकरराव यादव यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्यावतीने अभिवादन

दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि. प. अध्यक्ष दलितमित्र स्व. दिनकरराव भाऊसाहेब यादव यांची  जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक  उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
तसेच स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास  चेअरमन रघुनाथ पाटील यांनी, स्व. दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हाइस चेअरमन शरदचंद्र पाठक  व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक महेंद्र बागी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई, अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजीत पाटील, अमर यादव, निजामसो पाटील, दरगू माने गावडे, ज्योती कुमार पाटील, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, सौ. संगीता पाटील (कोथळीकर), सौ. अस्मिता पाटील, तज्ञ संचालक विजय सूर्यवंशी, निमंत्रित मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील (हालसवडे), रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूरखान मिस्त्री, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तसेच दत्त ऊस वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, निलेश गावडे, नगरसेवक  महादेव कुलकर्णी, संदीप कुरुंदवाडे, शिवाजी पाटील कौलवकर त्याचप्रमाणे दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
32 ° C
32 °
30.9 °
62 %
4.6kmh
20 %
Mon
31 °
Tue
32 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page