Homeकला - क्रीडाउद्यापासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

उद्यापासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर :
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक -२०२६’ फुटबॉल स्पर्धा १८ ते २९ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती कोल्हापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव व बालगोपाल तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या या स्पर्धेत स्थानिक सोळा संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, त्याच बरोबर उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बुधवारी (दि.१८) स्पर्धेचे उदघाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, विफाचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती संभाजी जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते होईल.
या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ गटातील १६ संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेला बालगोपाल तालीम मंडळचे उपाध्यक्ष निवास शिंदे, सेक्रेटरी राहुल चव्हाण, जॉईन सेक्रेटरी आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, सुदेश मगदूम, रोहन शिंदे, सुनील पवार, कपील मोहिते व अनिकेत सावंत आदी उपस्थित होते.
बक्षिसांचे स्वरूप….
स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक तर उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक तसेच उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड यांना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
70 %
2.9kmh
7 %
Mon
26 °
Tue
27 °
Wed
27 °
Thu
27 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page