Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’मध्ये १० पुरस्कार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’मध्ये १० पुरस्कार

• राष्ट्रीय स्पर्धेत ‘डीवायपीसीइटी व्हेक्टर्स’ संघ तृतीय
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या ‘एसएई इंडिया बाहा २०२६’ स्पर्धेत तब्बल १० पुरस्कारांवर नाव कोरले आहे. नरसापूर (हैद्राबाद) येथे या स्पर्धेत महाविद्यालयाच्या ‘डीवायपीसीइटी व्हेक्टर्स’ या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर एकूण ५१ संघांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
एसएई इंडिया बाहा २०२६ ही स्पर्धा सन २००७ पासून राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते. या स्पर्धेत देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वतः एटीव्ही (ऑल टेरेन व्हेईकल) तयार करून त्याचे डिझाईन, स्ट्रेस अ‍ॅनालिसिस, एक्सलरेशन, ब्रेकिंग, सस्पेन्शन, ट्रॅक्शन आदी तांत्रिक निकषांवर मूल्यमापन केले जाते.
संघाने विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सेल्स सादरीकरणात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक, डिझाईन व ओव्हरऑल स्टॅटिकमध्ये द्वितीय क्रमांक तर सीएई विश्लेषण, सस्टेनेबिलिटी, ड्युरॅबिलिटी, अ‍ॅक्सेलरेशन, सस्पेन्शन व ट्रॅक्शन तसेच ओव्हरऑल डायनॅमिक्स या विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळवत एकूण १० राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
या संघाचे नेतृत्व अर्षद सनदी यांनी केले. विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. एस. जे. रायकर यांचे प्रोत्साहन लाभले असून प्रा. दिपक सावंत व प्रा. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगत संघातील सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे व रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
70 %
2.9kmh
7 %
Mon
26 °
Tue
27 °
Wed
27 °
Thu
27 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page