कोल्हापूर :
गायन समाज देवल क्लबच्या वतीने आयोजित ३३व्या गोविंदराव गुणे स्मृती हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धेत अश्विनी बडवे यांनी गुणीदास पं.जगन्नाथबुवा पुरोहित स्मृतिचिन्हसह प्रथम क्रमांक पटकावला. तर जीवन पाटील याने द्वितीय तर सत्यम सिन्हा याने तृतीय क्रमांक पटकावला.
शनिवारी (दि.१४) झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, ठाणे, गदग, गोवा, नाशिक, संभाजीनगर, नागपूर येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना शिवाजी विद्यापीठाचे संगीत व नाट्यशास्त्र विभाग प्रमुख विनोद ठाकूरदेसाई यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यामध्ये अश्विनी बडवे यांनी गुणीदास पं.जगन्नाथबुवा पुरोहित स्मृतिचिन्हसह प्रथम क्रमांक पटकावला. तर जीवन पाटील याने द्वितीय तर सत्यम सिन्हा याने तृतीय क्रमांक पटकावला. सोजी मॅथ्यू व सिद्धार्थ गोडांबे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सूर प्रसाद गोखले यांना पंडिता श्रुती सडोलीकर काटकर पुरस्कृत जयपूर अतरौली गायकीसाठीचे विशेष पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेचे उदघाटन एस. जी. फायटो फार्मा प्रा.लि.चे संचालक दिलीप गुणे, राजेंद्र पित्रे, परीक्षक श्रीधर कुलकर्णी व सौ. स्नेहा राजूरीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व गोविंदराव गुणे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत तबला साथ ओंकार सूर्यवंशी व मयुरेश शिखरे, तर हार्मोनियम साथ श्रीधर सुतार, त्रिगुण पुजारी यांनी केली.
यावेळी कार्यवाह सचिन पुरोहित, राजेंद्र पित्रे, डॉ. भाग्यश्री मुळे व श्रीकांत डिग्रजकर, प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.
——————————
गोविंदराव गुणे स्मृती हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धेत अश्विनी बडवे यांना प्रथम क्रमांक
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.2
°
C
26.2
°
26.2
°
70 %
2.9kmh
7 %
Mon
26
°
Tue
27
°
Wed
27
°
Thu
27
°
Fri
27
°

