कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक वसिफा समीर कोतवाल यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे या विद्यापीठाकडून डॉक्टरेट (पीएचडी ) प्राप्त केली आहे.
‘एआय अँड आयओटी बेस्ड इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग अँड डिस्ट्रीब्यूशन’ या विषयावर त्यांनी संशोधन करून शोधप्रबंध सादर केला. त्यांनी हे संशोधन प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
डॉ. वसिफा कोतवाल यांच्या संशोधनामध्ये रिअल-टाइम आयओटी आधारित सेन्सिंग आणि एआयच्या साहाय्याने पाण्याच्या गुणवत्तेचे, प्रवाहाचे व दाबाचे त्वरित निरीक्षण करणे, प्रभागनिहाय अचूक पाणी मागणीचा अंदाज व नियोजन करणे, योग्य पाणी पुरवठासाठी सुलभ व वापरकर्ता-अनुकूल डॅशबोर्ड विकसित करणे या प्रणालीचा समावेश आहे.
यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र – कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डॉ. जयदीप पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. समीर कोतवाल यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.
——————————
प्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
64 %
4.4kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
27
°
Wed
28
°

