Homeशैक्षणिक - उद्योग श्री दत्त कारखान्याकडून गाळपास उपलब्ध झालेल्या ऊसाची बिले एकरक्कमी विनाकपात आदा

श्री दत्त कारखान्याकडून गाळपास उपलब्ध झालेल्या ऊसाची बिले एकरक्कमी विनाकपात आदा

कोल्हापूर :
श्री दत्त कारखाना सहकारी साखर कारखाना, शिरोळ यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात ११,७८,७०५ मे.टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात १२.३५ टक्के साखर उतारा मिळाला आहे व १२,८५,९७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने कमी दिवसात जास्तीचे गाळप केले आहे. कारखान्याने या हंगामात गळीत केलेली सर्व ऊसाची प्रति टन रुपये ३४५० प्रमाणे देय होणारी रक्कम १००% आदा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
केंद्र शासनाच्या एफआरपीचे धोरणानुसार कारखान्यास या हंगामात गाळपास उपलब्ध होणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये ३,३७८ देय होती. परंतु कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गाळपास उपलब्ध होणाऱ्या ऊसास प्रति टन रुपये ३४५० देण्याचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार कारखान्यास हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या एकूण ११,७८,७०५ मे. टन ऊसाचे बिल एकूण रुपये ४०६ कोटी ६५ लाख ३२ हजार इतके शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्याने या हंगामात गळीत केलेली सर्व ऊसाची प्रति टन रुपये ३४५० प्रमाणे देय होणारी रक्कम १००% आदा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, दरगु गावडे, प्रमोद पाटील, शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
————————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
64 %
4.4kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
27 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page