Homeशैक्षणिक - उद्योग विद्यार्थ्यांना मिळणार ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी

विद्यार्थ्यांना मिळणार ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी

• डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचा एरोबॉट्झसोबत सामंजस्य करार
कोल्हापूर :
विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञान विषयक कौशल्ये आत्मसात करून उद्योगाभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाने एरोबॉट्झ अनमॅन्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातर्गत लवकरच विद्यार्थ्यांसाठी ड्रोन व मानवरहित हवाई वाहन तंत्रज्ञानातील अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
विद्यापीठाच्या आंतरशाखीय अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने (सीआयएसआर) हा करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कौशल्यविकास कार्यक्रम, प्रत्यक्ष ड्रोन प्रशिक्षण, कार्यशाळा, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच ज्ञानविनिमय उपक्रम राबविण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष हाताळणी करता येणार असून उद्योग क्षेत्रातील गरजांनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.
या सामंजस्य करारावर कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत, सीआयएसआरचे संचालक डॉ. योगेश चिमटे तसेच एरोबॉट्झ अनमॅन्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे संचालक रेजू आर. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सबरीश्वरन आर. उपस्थित होते.
यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील,

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
66 %
5.1kmh
0 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
26 °
Thu
25 °
Fri
25 °

Most Popular

You cannot copy content of this page