कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, सर्जनशीलता आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च विद्यापीठात उत्साहात पार पडला.
या समारंभात इनोव्हेंचर फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रांजल गुंडेशा, विद्यापीठाचे महासंचालक प्रा. डॉ. तपस गांगुली, तसेच महाराष्ट्र राज्यपालांचे नामवंत वैद्यकीय सल्लागार डॉ. विनोद शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान इनव्हेंचर नॅशनल चॅलेंज २०२५-२६ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या उत्कृष्ट सहभागामुळे मिळाला. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम इनोव्हेंचर वर्ल्ड फाउंडेशन (इंटेलिजन्स प्लस) यांच्या वतीने आयआयटी हैदराबादच्या उद्योजकता विभाग आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता.
या यशाबद्दल संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. विश्वस्त विनायक भोसले यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शाळेच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या संचालिका सस्मिता मोहंती यांनी, “हा पुरस्कार शाळेत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, संगणक विज्ञान आणि डेटा विश्लेषण यासारख्या क्षेत्रातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना तयार करून, वैश्विक विचारसरणी, नवोपक्रम आणि वास्तविक जगातील समस्या सोडवण्यावर भर देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांची पावती आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच.एम नवीन, डे बोर्डींग विभागाचे प्राचार्य अस्कर अली उपस्थित होते.
——————————
घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन’ पुरस्कार
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
61 %
2.6kmh
0 %
Tue
26
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°

