कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे ३० व ३१ जानेवारी रोजी ‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्रायोगिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज तसेच सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च, कदमवाडी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आय. क्यू. ए. सी. उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, संशोधकांना प्रायोगिक प्राणी हाताळणी, संशोधनातील नैतिकता, पर्यावरणीय समृद्धी व प्रयोगशाळा प्राणी विज्ञानाशी संबंधित अद्ययावत वैज्ञानिक ज्ञान प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्री-क्लिनिकल संशोधन, प्रयोगशाळेतील प्राणी विज्ञान, प्रायोगिक प्राण्यांचे नैतिक हाताळणी तत्त्वज्ञान तसेच पर्यावरणीय समृद्धी यासंबंधी अद्ययावत, वैज्ञानिक व व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये आणि संशोधकांमध्ये विकसित करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
कार्यशाळेत फार्माकोलॉजी विषयातील नामवंत व अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉ. नीरज व्यवहारें (पुणे), डॉ. व्यंकट रमण (हैदराबाद), डॉ. सी. आर. पाटील (धुळे), डॉ. आर. वाय. पाटील (सोलापूर), डॉ. प्रल्हाद वांगिकर (पुणे), डॉ. विश्वेश डांगे (पुणे) तसेच डॉ. संदीप पाटील (सांगली) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सौ. सोनाली दिवटे, डॉ. प्रमोद भालेराव, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अश्विनी काळे, डॉ. पूनम चौगुले, डॉ. अशोक थुल्लूरु व डॉ. संदीप कडशी हे समन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
——————————
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय कार्यशाळा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

