Homeकला - क्रीडाअभय चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

अभय चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘अभय चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाखेमधील शाळा व महाविद्यालयातून एकूण ३८ संघांनी सहभाग घेतला होता. या क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचा अंतिम सामना डी. के. ए. एस. सी. कॉलेज इचलकरंजी व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मुख्य कार्यालय या संघांमध्ये अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डी.के.ए.एस.सी. कॉलेज संघाने ८ षटकांत ८० धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचा पाठलाग करताना संस्था मुख्य कार्यालयाच्या संघाने ५.२ षटकातच ८२ धावा पूर्ण करत अभय चषकाचा मानकरी ठरले. सामनावीर म्हणून साद मुजावर (नाबाद ५६ धावा व १ बळी) कर्णधार अमित साळुंखे, उपकर्णधार प्रशांत कांबळे यांची कामगिरी मोलाची ठरली. तृतीय क्रमांक लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा संघाने मिळविला. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज संजय शेडगे (धाराशिव), उत्कृष्ट गोलंदाज दादा माळी (धाराशिव), मालिकावीर मुजफ्फर लगीवाले (इचलकरंजी), उत्कृष्ट झेल रोहन जाधव (सातारा), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन निगवे (संस्था कोल्हापूर) ठरले.
यशस्वी संघातील खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
बक्षीस समारंभासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, मुरलीधर गावडे, हितेंद्र साळुंखे, माजी जिमखाना विभाग प्रमुख एम. जी. गायकवाड, प्रा. किरण पाटील, प्राचार्य एस. के. खाडे, ॲड. हितेश राणिंगा. सुहास थोरात, अभय निंबाळकर, अभिजीत कोरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रितेश पाटील, किशोर मेथे, नौशाल पुरी, संजय भोसले, मंगेश मगदूम व सुरेश चरापले यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
42 %
3.1kmh
20 %
Thu
28 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page