Homeकला - क्रीडावेताळमाळ आणि प्रॅक्टीस क्लब विजयी 

वेताळमाळ आणि प्रॅक्टीस क्लब विजयी 

कोल्हापूर :
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी वेताळमाळ तालीम मंडळ आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला.
दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने बालगोपाल तालीम मंडळवर २-१ गोलने विजय मिळवला. सामन्यास सुरुवात होताच झालेल्या पहिल्याच चढाईत राहुल पाटीलच्या पासवर आकाश माळीने गोल नोंदवला. सामना सुरु होताच अवघ्या २१ सेकंदात आकाश माळीने संघाचा पहिला गोल फलकावर झळकवला. आक्रमणातील सातत्य कायम राखत सर्वेश वाडकरने ६ व्या मिनिटाला संघाला दुसऱ्या गोलची आघाडी मिळवून दिली. २-०ने पिछाडीवर आलेल्या बालगोपालने खोलवर चढाया केल्या. त्यांच्या विश्वविजय घोरपडे, अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, प्रणव गायकवाड, सुजित राजगोपालन यांनी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी वाया गेल्या. देवराज मंडलिकने गोलच्या दिशेने मारलेल्या चेंडूला गोलरक्षक रणवीर खालकरने बाहेर काढून गोलचे संकट टाळले.
उत्तरार्धात वेताळमाळकडून मितेई, शोएब बागवान, सर्वेश वाडकर, आकाश माळी यांनी वेगवान चाली रचल्या पण समन्वयाचा अभाव आणि दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. राहुल पाटीलने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक माजिद अहमदने पंच करून बाहेर काढला. बालगोपालकडून झालेल्या एका चढाईत सुजित राजगोपालन याने गोल करून आघाडी २-१ वर आणली. अखेर उर्वरित वेळेत २-१ ची आघाडी राखून वेताळमाळने सामना जिंकला.
प्रॅक्टीस क्लब विजयी….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ३-० गोलने विजय मिळवला. पूर्वार्धात सागर चिलेने २४व्या मिनिटास गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर जादावेळेत मुद्दसर शेख याने गोल नोंदवून आघाडी २-० अशी वाढवली. पूर्वार्धातील २-० आघाडीमुळे उत्तरार्धात प्रॅक्टीस क्लबने खोलवर चाली केल्या. त्यामध्ये त्यांना ६३व्या मिनिटाला यश मिळाले. सचिन गायकवाडने गोल करून आघाडी ३-० अशी भक्कम केली. तत्पूर्वी, सुभाषनगरच्या आर्यन पंदारे याने गोलक्षेत्रात जोरदार चढाई केली. यावेळी त्याला नियमबाह्य पद्धतीने रोखल्याने मुख्यपंच गौरव माने यांनी पेनल्टी किक दिली. त्यावर प्रकाश संकपाळने मारलेल्या चेंडूला गोलरक्षक जुडसन याने उजव्या बाजूला झेपावत रोखून गोलची संधी फोल ठरवली. सुभाषनगरकडून सुधीर कोटिकला, आर्यन पंदारे, जावेद जमादार, रोहन चव्हाण, प्रकाश संकपाळ यांनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही. अखेर ३-० ची आघाडी राखून प्रॅक्टीस क्लबने विजयावर शिक्कामोर्तब केले.
——————————————————-
आजचे सामने…
• संध्यामठ – फुलेवाडी : दु. १:३० वाजता
• पीटीएम (अ) – शिवाजी : दुपारी ४ वा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
53 %
2.6kmh
52 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page