• सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते उदघाटन
कोल्हापूर :
लोककल्याणकारी राज्य साकारायचे असेल, तर शिक्षण आणि आरोग्य हे दोन अविभाज्य स्तंभ म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. तळसंदे येथे सुरु केलेल्या शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागतील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे प्रतिपादन डीएमआयएचईआरचे प्र कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. ते सौ. शांतादेवी डी . पाटील हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी, तळसंदे येथे सौ. शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे उदघाटन सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतीनिकेतनच्या संचालिका सौ. राजश्री काकडे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व देवश्री पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राजेश ख्यालाप्पा, वैद्यकिय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मिश्रा म्हणाले की, गरीबातील गरीब रुग्णालाही दर्जेदार, सुलभ व सन्मानपूर्वक आरोग्यसेवा मिळणे हीच आधुनिक भारताची ओळख आहे. कोविड-१९ महामारीने सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ग्रामीण व निमशहरी भागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. डी. वाय. पाटील ग्रुपने तळसंदे येथे हे हॉस्पीटल उभारून ग्रामीण आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले आहे.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, तळसंदे भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असे आणि दर्जेदार सुविधा देणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची संकल्पना होती. त्यानुसार सुमारे वर्षभरातच या हॉस्पिटलची उभारणी करून आईंच्या वाढदिवसानिमित्त त्याचे उदघाटन करण्यात आले. याठिकाणी अत्याधुनिक सुविधा तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत दिल्या जातील. सुरुवातीला १०० बेडचे हे हॉस्पिटल सुरू केल असून लवकरच ३०० बेडमध्ये विस्तारित केले जाईल. या हॉस्पिटलच्या माध्यमातून समर्पित भावनेने रुग्णसेवा केली जाईल.
यावेळी सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पद्मजा देसाई यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी, विविध संस्थांचे प्राचार्य, अधिकारी उपस्थित होते.
——————————
शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा तळसंदे येथे शुभारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

