कोल्हापूर :
राज्यस्तरीय मानांकित १० वर्षाखालील मुले व मुली टॉप-८ प्लेअर्स लॉन टेनिस स्पर्धेमध्ये लोक अलंद (सोलापूर) व अधिरा भगत (पुणे) यांनी विजेतेपद पटकाविले. मुलांमध्ये तिसरा क्रमांक पलाश रूचंदाणी (पुणे) व चौथा क्रमांक वीर पधारिया (मुंबई) यांना मिळाला. तर मुलींमध्ये तिसरा क्रमांक अन्वी साहू (पुणे) व चौथा क्रमांक भार्गवी भोसले (सांगली) यांना मिळाला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आयोजित व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन च्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय मानांकित १० वर्षाखालील मुले व मुली टॉप-८ प्लेअर्स यांचा कोचिंग कॅम्प व लॉन टेनिस स्पर्धा के.एस.ए.च्या साठमारी येथील टेनिस कॉम्लेक्स् येथे संपन्न झाली.
या लिग कम नॉकाऊट स्पर्धेत पुणे, सोलापूर, नवी मुंबई, पुणे, धुळे, बारामती, बीड, सांगली व कोल्हापूर येथील मानांकित स्पर्धक होते. मुलांचे एकूण १५ सामने मुलींचे एकूण १५ सामने असे एकूण ३० सामने खेळविणेत आले. स्पर्धा टुर्नामेंट डायरेक्टर माणिक मंडलिक यांच्या निरीक्षणाखाली एमएसएलटीएच्या वतीने नेमण्यात आलेले टुर्नामेंट सुपरवायझर व मुख्य प्रशिक्षक मेहुल केनिया व सहाय्यक प्रशिक्षक प्रकाश पाटील यांनी कामकाज पाहिले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ केएसएचे ऑन. फायनान्स सेक्रेटरी नंदकुमार बामणे व कार्य.सदस्य दिपक घोडके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी एमएसएलटीए टुर्नामेंट सुपरवायझर व मुख्य प्रशिक्षक मेहुल केनिया व सहाय्यक प्रशिक्षक प्रकाश पाटील तसेच पंच व पालक वर्ग उपस्थित होते. स्पर्धेतील कोचिंग कॅम्पसाठी सायकॉलॉजिस्ट लेक्चर ठाकूर साहिल राज, स्ट्रेंथ अँड कंडीशनल कोच तुषार पराडकर, फिजिओलॉजिस्ट कोच राहुल मुंडल, न्यूट्रीशन साक्षी मंगीराज यांचे सहकार्य लाभले.
लॉन टेनिस स्पर्धेमध्ये लोक अलंद व अधिरा भगत यांना विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.7
°
C
24.7
°
24.7
°
49 %
2.8kmh
0 %
Mon
27
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°
Fri
26
°

