कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅचच्या (सन २०००) माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन कॅम्पसला भेट दिली. आपल्या करियरला दिशा देणाऱ्या या महाविद्यालयाबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या माजी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्या कॉलेज जीवनातील अनुभव, संघर्ष, आठवणी तसेच व्यावसायिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर करियर संधीबाबतही मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळाली.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांची या विद्यार्थ्यानी भेट घेत संस्थेचा विस्तार व प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच आपलेउत्तम करिअर घडवल्याबद्दल संस्था व व्यवस्थापनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. संजय डी. पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत संस्थेने केलेल्या उल्लेखनीय विकासाचा आढावा घेत भविष्यातील डी. वाय. पाटील ग्रुपचा दृष्टीकोन मांडला.
तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय. पाटील ग्रुपच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना भेट म्हणून टी-शर्ट व कॅप्स प्रदान करण्यात आल्या.
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे सहकार्य लाभले. आर्किटेक्चर विभागप्रमुख इंद्रजित जाधव व सहकाऱ्यांनी नियोजन केले.
——————————
डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅच विद्यार्थ्यांची महाविद्यालयास भेट
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

